विभागातील उत्कृष्ट खेळाडू

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण कामगिरी केलेले काही प्रमुख खेळाडूंची माहिती.खालील प्रमाणे

1 ओजस प्रविण देवतळे-कंपाउंड धनुर्विद्या
(Compound Archery):


प्रमुख यश:

• २०२३ मध्ये बर्लिन येथे झालेल्या वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या वैयक्तिक कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक विजेता; हे पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष धनुर्धारी.

• २०२२ हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदके – वैयक्तिक, मिश्र संघ आणि पुरुष संघ प्रकारात.

• २०२३ पॅरिस वर्ल्ड कपमध्ये पुरुष संघ प्रकारात सुवर्णपदक.
2 दिव्या देशमुख-बुद्धिबळ (Chess):

प्रमुख यश:

• २०२४ मध्ये FIDE वर्ल्ड अंडर-२० गर्ल्स चेस चॅम्पियनशिप विजेती; ११ पैकी १० गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले.

• २०२४ च्या ४५व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताच्या महिला संघात सहभागी; बोर्ड ३ वर खेळून वैयक्तिक वर्णपदक जिंकले आणि संघाला सुवर्णपदक मिळवून दिले.

• २०२३ मध्ये अल्माटी येथे झालेल्या आशियाई महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये विजेती.

• २०२२ मध्ये महिला भारतीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप विजेती.

• २०२० मध्ये FIDE ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक विजेती.

3 मालविका बनसोड-बॅडमिंटन:

प्रमुख यश:

• २०१९ मध्ये मालदीव आंतरराष्ट्रीय फ्यूचर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत विजेती.

• २०१९ मध्ये नेपाळमध्ये अन्नपूर्णा पोस्ट आंतरराष्ट्रीय मालिकेत विजेती.

• २०१९ मध्ये बाहरेन आंतरराष्ट्रीय मालिकेत कांस्यपदक विजेती.

• २०२४ मध्ये यूएस ओपन विजेती.

• २०२५ मध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश; जागतिक क्रमवारीत २३ वा क्रमांक मिळवून भारतातील तिसरी महिला खेळाडू ठरली, जिने टॉप २५ मध्ये स्थान मिळवले.

• २०२४ मध्ये हायलो ओपन (Hylo Open) स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली.
4 जयंत जयप्रकाश दुबळे-ओपन वॉटर स्विमिंग (Open Water Swimming):

प्रमुख यश:

• इंग्लिश चॅनल द्विपथ (Two-way) पोहणे: २०२३ मध्ये इंग्लंड ते फ्रान्स आणि परत ७० किमी अंतर ३१ तास २९ मिनिटांत पूर्ण करून आशियाई विक्रम प्रस्थापित केला.

• कॅटालिना चॅनल (अमेरिका): २०२३ मध्ये ३२ किमी अंतर १४ तास ५२ मिनिटांत पार करून ऐतिहासिक कामगिरी केली.

• नॉर्थ चॅनल (आयरलंड-स्कॉटलंड): २०२२ मध्ये ४० किमी अंतर १४ तास ३९ मिनिटांत पार करून प्रथम आशियाई रिले संघाचा भाग.

• पाल्क स्ट्रेट (भारत-श्रीलंका): २०२१ मध्ये पार केले.

• इतर स्पर्धा: ८१ किमी पश्चिम बंगाल, ११० किमी मुंबई-गोवा, ३५ किमी वीर सावरकर स्पर्धा इ.
5 अल्फिया तरन्नुम खान पठाण-बॉक्सिंग (महिला सुपर हेवीवेट, 81+ किग्रॅ):

प्रमुख यश:

• ASBC आशियाई एलिट बॉक्सिंग चॅम्पियनशिप (अम्मान, जॉर्डन, २०२२): महिला 81+ किग्रॅ गटात सुवर्णपदक विजेती; महाराष्ट्रातून ही कामगिरी करणारी पहिली महिला बॉक्सर.

• AIBA युथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप (पोलंड, २०२१): 81+ किग्रॅ गटात सुवर्णपदक; AIBA फॅन्स पोलमध्ये 'बेस्ट वुमन बॉक्सर' म्हणून निवड.

• एशियन जूनियर गर्ल्स चॅम्पियनशिप (२०१९): सुवर्णपदक विजेती.

• एड्रियाटिक पर्ल युथ बॉक्सिंग टूर्नामेंट (२०२१): भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले.

• एशियन U-22 चॅम्पियनशिप (कझाकस्तान, २०२४): रौप्यपदक विजेती.

• खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स (२०२४): नागपूर विद्यापीठासाठी सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला बॉक्सर.

विभागीय क्रीडा संकुल नागपूर.